Sunday 29 January 2017

सर्वापासून दूरच होतो

घरट्यात एक पाखरू
गाणं गुणगुणत होतं
बरं वाटलं कानांना
डिजे पेक्षा त्याचं गाणं सुंदर होतं..

आज मस्त रानात गेलो
पाय वाटने चालत होतो
आवाज फक्त पक्षांचा
गाड्यांच्या कर्कश आवाजापासून दूर होतो ...

रोजचं हे दुसऱयासाठी जगणं
स्वत: साठी वेळच नसतो
दुसऱयाची कामे करूनही शिव्या
त्यातचं आनंद शोधणं भागच असतो...

पण बरं वाटलं
आज मी मोकला होतो
सारी कामे दूर सारत
स्वत:साठी जगत होतो

खरचं आज मी खूष होतो
साऱयांची थट्टा मस्कीरी करत होतो
आनंदाच्या रानात मी एकटाचं
उनाड पाखरासारखा मस्त फिरत होतो ...

 -  प्रतिक तुपे, दापोली
 सर्वापासून दूरच होतो

No comments:

Post a Comment

happy