Sunday 2 July 2017

sakhe tu na


tumachya mulech


ti


tu


jal


chandawa


osad watevar


lay bhari wat


tujha aabhyas


pandurang


kajawa


majhi kavita


kalrfull


majhya sathi tine


kavitene mala


aaple git


mi aathavanit tujha


Monday 27 February 2017

वहीच्या पेजवर...

वहीच्या पेजवर
मी रायटींग रायटींग करायचो
कधी कवीता तर कधी
तुझ्यावर लेख लिहायचो...

वहीच्या पेजवर
मी नेहमी तुझच नाव लिहायचो
कोणी बघेल म्हणून
घडी घालून वही लपवून ठेवायचो...

वहीच्या पेजवर
मी मोठा असा बदाम काढायचो
त्यात तुझं आणि माझ नाव लिहून
वही घट्ट मी ह्य्दयाशी धरून बसायचो...

वहीच्या पेजवर मी
असंच काहीतरी करायचो
अभ्यास एके अभ्यास करता
मध्येच सुंदर असं तुझचं नाव लिहायचो...
                              -  प्रतिक तुपे, दापोली
                                   वहीच्या पेजवर...

भावना

तुला काय वाटं हे जगं आपलं आहे
येथे साऱयांच्या बघायच्या नजारच वेगळ्या आहेत...

मैत्रीत देखील येथे भावना आहेत
काहींच्या चांगल्या तर काही वाईट आहेत...

 हे जगच सारं दुषित आहेत
येथे पाहण्याचा दुष्टीकोन तिरकाच आहे...
 
 तुला ढकलणारा तुझ्या आपला तर कोणी वेगळा आहे
सावरण्यासाठी हात देणारा येथे भावनिक वृत्तीचा आहे...

     या जगात ठिकायचं म्हणजे
     साऱयांना ओळखायला हवं
    नाहीतर फायदा दुसऱयाचा
   आणि तोटा मात्र आपलाच आहे...
       
         - प्रतिक तुपे, दापोली
              भावना

तुझी फ्रेंडशीप

तुझ्या प्रेमा पेक्षा मला
तुझी फ्रेंडशीप हवी आहे
मन मोकलं बोलण्यासाठी
तुझ्या ह्य्दयात जागा हवी आहे...

मी तुला प्रपोज केला तर
तुला कदाचित राग ही येईल
म्हणून मी काहीच बोलत नाही
कारण मला तुझी फ्रेंडशीप हवी आहे...

आवडतेस तु मला
पण सांगणाच होत नाहीये
सोडून जाशील अशी
मनात भीतीची छाया आहे...

प्रपोज करून तु नकार दिलास
तरी मला तुझ्या राग नाही येणार
पण जेव्हा सोडून जाशील मला
तेव्हा मात्र मी स्वत: माफ नाही करू शकणार...
             - प्रतिक तुपे, दापोली
                        तुझी फ्रेंडशीप

भावना

तुला काय वाटं हे जगं आपलं आहे
येथे साऱयांच्या बघायच्या नजारच वेगळ्या आहेत...

मैत्रीत देखील येथे भावना आहेत
काहींच्या चांगल्या तर काही वाईट आहेत...

 हे जगच सारं दुषित आहेत
येथे पाहण्याचा दुष्टीकोन तिरकाच आहे...
 
 तुला ढकलणारा तुझ्या आपला तर कोणी वेगळा आहे
सावरण्यासाठी हात देणारा येथे भावनिक वृत्तीचा आहे...

     या जगात ठिकायचं म्हणजे
     साऱयांना ओळखायला हवं
    नाहीतर फायदा दुसऱयाचा
   आणि तोटा मात्र आपलाच आहे...
       
         - प्रतिक तुपे, दापोली
              भावना

तिला पाहण्यासाठी

तारेवरची कसरत केली
तीलाच पाहण्यासाठी
जणू अग्नी परीक्षा ही दिली
तीला मिळविण्यासाठी...

उशीरा घरी यायची
ती नेहमी ऑफिस मधून
आणायला जायचो मी
घरी खोटं बोलून....

जेव्हा कळलं तीच्या घरी
तेव्हा मात्र झाला राडा
मार्ग पत्करला तीने
विषाचा ओठी प्याला...

जेव्हा ओठांना माझ्या स्पर्श
विषाचा संचार अंगी झाला
आणि काही बोलायच्या आतच
 प्राण हवेवर विहार तो झाला...
       - प्रतिक तुपे , दापोली
         तिला पाहण्यासाठी

वळणावर...

प्रत्येक वळणावर मी
तीच्या साठी थांबायचो
ती उशीरा आली भेटायला
तरी मी कधी नाही रागवायचो ...

सारे दिवस खूप मस्तीत  
तेव्हा घालवायचो आम्ही
तु तू मी मी करत
प्रेमाला एकांत फुलवायचो आम्ही ...

पण अचानक वादळात
तुटली सारी नाती
ती गेली दूर निघून
मी मात्र आजून तिथेच वाट पाही .....

असे वाटते कधी कधी
पुन्हा शोधात येईल ती
येण्याची आशा मनात ठेवून मी
त्या वळणावर मागे फिरून पहातो आजूनही..
          - प्रतिक तुपे, दापोली
                 वळणावर...

Sunday 29 January 2017

मानस इतकी बदलतात
जुन सार सोडून
नव धरू पाहतात
हातात पक्षी मिळणार नाही
तरी ते त्याच्या मागे धावतात

मानस इतकी बदलतात
सखी नाती-गोती सोडून
परकी नाती जास्त जपतात
धावत्या हरणा प्रमाणे

मानस इतकी बदलतात
आपल ते खोट आणि दुसऱ्याचते खर
निर्मल नदीला सोडून
ते समुदाला धरू पाहतात
 -    प्रतिक तुपे, दापोली
                     मानस...

सर्वापासून दूरच होतो

घरट्यात एक पाखरू
गाणं गुणगुणत होतं
बरं वाटलं कानांना
डिजे पेक्षा त्याचं गाणं सुंदर होतं..

आज मस्त रानात गेलो
पाय वाटने चालत होतो
आवाज फक्त पक्षांचा
गाड्यांच्या कर्कश आवाजापासून दूर होतो ...

रोजचं हे दुसऱयासाठी जगणं
स्वत: साठी वेळच नसतो
दुसऱयाची कामे करूनही शिव्या
त्यातचं आनंद शोधणं भागच असतो...

पण बरं वाटलं
आज मी मोकला होतो
सारी कामे दूर सारत
स्वत:साठी जगत होतो

खरचं आज मी खूष होतो
साऱयांची थट्टा मस्कीरी करत होतो
आनंदाच्या रानात मी एकटाचं
उनाड पाखरासारखा मस्त फिरत होतो ...

 -  प्रतिक तुपे, दापोली
 सर्वापासून दूरच होतो

हिते असं काहीतरी आहे

हे जग असं ही आहे
हिते काही आपलं आपलं,पण नाहीये
गरजेसाठी आपण आपण
नंतर मात्र किमंत नाहिये..

व्यथा त्रास असून हि
कोणा सांगण महत्वाचं नाहिये
दुसऱयाच ऐकून सांत्वन करणं
आपणं मात्र मोकलं रडायचं आहे ...

हिते हे असचं आहे
आपलं आपलं पण नाहिये
आपण मात्र दुसऱयासाठी
हिते आपल्यासाठी कोणी नाहिये...

हे जगं आता असचं आहे
हिते वापर जास्त आहे
झिज झाल्यावर टाकून देण्याची
हिते प्रत्येकालाच सवय आहे...
      - प्रतिक तुपे, दापोली
     हिते असं काहीतरी आहे

सर्वापासून दूरच होतो

घरट्यात एक पाखरू
गाणं गुणगुणत होतं
बरं वाटलं कानांना
डिजे पेक्षा त्याचं गाणं सुंदर होतं..

आज मस्त रानात गेलो
पाय वाटने चालत होतो
आवाज फक्त पक्षांचा
गाड्यांच्या कर्कश आवाजापासून दूर होतो ...

रोजचं हे दुसऱयासाठी जगणं
स्वत: साठी वेळच नसतो
दुसऱयाची कामे करूनही शिव्या
त्यातचं आनंद शोधणं भागच असतो...

पण बरं वाटलं
आज मी मोकला होतो
सारी कामे दूर सारत
स्वत:साठी जगत होतो

खरचं आज मी खूष होतो
साऱयांची थट्टा मस्कीरी करत होतो
आनंदाच्या रानात मी एकटाचं
उनाड पाखरासारखा मस्त फिरत होतो ...

 -  प्रतिक तुपे, दापोली
 सर्वापासून दूरच होतो